

Pune Water Crisis May Ease As PMC Plans To Get 5 TMC Water From Mulshi Dam And Starts Feasibility Assessment Report Process
sakal
पुणे: वाढते नागरीकरण आणि समाविष्ट गावांमुळे तहानलेल्या पुणे शहराची भविष्यातील पाण्याची चिंता मिटवण्यासाठी मुळशी धरणातील सात टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकार व टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यापैकी पुणे शहराला पाच टीएमसी पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी तांत्रिक बाबी आणि आर्थिकदृष्ट्या ते व्यवहार्य आहे का, याची तपासणी करण्यासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.