

Pune Water Planning CM Fadnavis to Hold Key Meeting on Water Allocation for Pune Pimpri Chinchwad and Nearby Areas
sakal
पुणे : वाढती लोकसंख्या, विस्तारणारी शहरे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे पाण्याची गरज वाढत आहे. त्यात यंदा दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह परिसरातील तालुक्यांचा समावेश असलेल्या पुणे महानगर प्रदेशाच्या (पीएमआर) पाणी नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २०) महत्त्वाची बैठक होणार आहे.