
पुणे : वडगाव जलकेंद्रावर गुरुवारी (ता.३१) दुपारी १२ ते २ या वेळेत महावितरण कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत वडगाव जलकेंद्रातील पाणी पुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असून, या जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा धायरी, हिंगणे, आंबेगाव आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.