Pune News: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत ८७.७७ टक्के पाणीसाठा, चारही धरणांत मिळून २५.५४ टीएमसी साठा

Pune Water Supply Gets Relief as Khadakwasla Dams Fill Up: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत २५.५४ टीएमसी म्हणजेच ८७.७७ टक्के पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असून शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
Pune Dams Update Khadakwasla Dam Chain Holds 25.54 TMC Water Storage as Reservoir Levels Continue to Rise

Pune Dams Update Khadakwasla Dam Chain Holds 25.54 TMC Water Storage as Reservoir Levels Continue to Rise

sakal

Updated on

पुणे : पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरणसाखळीत रविवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजेपर्यंत २५.५४ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ८७.७७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सातत्याने पाण्याची आवक होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत २४.८४ टीएमसी (८५.२० टक्के) पाणीसाठा होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com