समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा, सांडपाणी कामांना गती

समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा, सांडपाणी कामांना गती
Published on

पुणे, ता. १३ : पुणे महापालिकेत समाविष्ट सात गावांमधील पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांच्या कामांना गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अर्बन चॅलेंज फंडा’तून महापालिकेला ७१० कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसांत मिळणार आहे.
देशातील मोठ्या शहरांमधील पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने चार लाख कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. त्याअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महापालिकेने राज्य सरकारमार्फत प्रस्ताव पाठवले होते. पुण्याला मिळणाऱ्या या निधीतून वाघोली, मांजरी, हंडेवाडी-औताडेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडी या भागांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारली जाणार आहेत.
अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली ३५० कोटींची कामे यापुढेही सुरू राहतील. महापालिकेला आतापर्यंत एक हजार २९० कोटींचा निधी मिळाला असून, लवकरच आणखी ७५० कोटी मिळण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त निधीतून पुढील टप्प्यात रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

शहरात समाविष्ट झालेल्या सात गावांमधील पिण्याचे पाणी, सांडपाणी वाहिन्या यांच्या कामासाठी केंद्र सरकारने ७१० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी येत्या काही दिवसांत महापालिका प्रशासनास मिळणार आहे. त्यातून संबंधित गावांतील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Power Connectivity Fund to Accelerate Jal Jeevan Mission in 11 Ambegaon Villages
Pune
Pune
Pune Water Supply
Marathi News Esakal
www.esakal.com