

Pune Water Supply Update: Dam Storage Reaches 91.47%, Khadakwasla Full
esakal
पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये एकूण ९१.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उशिराने सक्रिय झालेल्या मॉन्सूननंतरही धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत सध्या सकारात्मक चित्र दिसून येत आहे.