
राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात मागील चार ते पाच दिवसापासून पाऊस कोसळत आहे, यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागिकांची तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पुढील पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.