
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह घाट विभागातील पावसाचा जोर ओसरला आहे. रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांतदेखील हवामानात फार मोठा बदल होणार नसल्याने हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.