

Three-Day Rain Break Expected
Sakal
पुणे : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी (ता. २) विश्रांती घेतली आहे. पुढील तीन दिवसदेखील पावसाची विश्रांती कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पावसाने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.