Pune Weather : कोकण-गोव्यासह विदर्भात पावसाची शक्यता, रायगड-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट
Pune Rain : पुढील २-३ दिवस महाराष्ट्रात कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज असून पुणे, घाट विभागात मध्यम ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे, हवामान खात्याचा इशारा.
पुणे : कोकण-गोव्यासह विदर्भात बुधवार (ता. ३) आणि गुरुवारी (ता. ४) बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.