Predicted Drop in Minimum Temperature of Pune
Sakal
पुणे : आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कायम असल्याने पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पुण्यातील किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची चिन्हे आहेत. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.