
पुणे : शहरात दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली आहे, तर पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे, तसेच शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.