
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. शनिवारी (ता. ४) कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत हवामानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याने आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.