
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे चिखल, वाहतूक कोंडी, वीज खंडित होणे अशा त्रासांना सामोरे गेलेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मॉन्सूनची गती मंदावल्याने पुढील काही दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.