

Pune Experiences Light Showers Causing Cool Weather
Sakal
पुणे : शहर परिसरात शनिवारी (ता. १) हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाची शक्यता नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पावसाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.