Pune Monsoon Update: पुढील तीन दिवस तापमानात बदल नाही, पुण्यात हलक्या पावसाची शक्यता,पुढील तीन दिवसांचा अंदाज वाचा
Pune News : पुणे आणि परिसरात पुढील तीन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून तापमान २९ अंशांपर्यंत स्थिर राहणार आहे. घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस हवामानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याने आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.