

Pune Temperature Slightly Up
Sakal
पुणे : पुण्यात सलग तीन दिवस गोठवणाऱ्या थंडीनंतर गुरुवारी (ता. २०) किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. शहरात अनेक ठिकाणी १० ते ११ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किमान तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरमध्ये ११, तर पाषाणमध्ये १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमान गुरुवारी नोंदविण्यात आले.