

Pune Temperature Update Maximum Temperature Drops to 32 Degrees Celsius Light Rain Expected in Pune Over Next Few Days
sakal
पुणे: गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. परिणामी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र शनिवारी (ता. ३१) कमाल तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली. पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी घट नोंदविण्यात येणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.