
पुणे : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून आता पुन्हा ऊन-पावसासह हलक्या सरींचा खेळ सुरू झाला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर रविवार (ता. २४) ते मंगळवार (ता. २६) यादरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. रायगड जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.