Hadapsar Bhekrai Nagar Incident
Sakal
पुणे : मुल होत नसल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना हडपसरमधील भेकराईनगर परिसरात शुक्रवारी घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती आकाश विष्णू दोडके (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.