Pune Divorce Case
esakal
पुणे : घटस्फोटानंतर पत्नीला पतीकडून पोटगी मिळणे ही सर्वसाधारण बाब मानली जाते. मात्र पुण्यात घडलेल्या एका प्रकरणात याउलट चित्र पाहायला मिळाले. येथे पत्नीनेच घटस्फोटासाठी पतीला ५० हजार रुपये देण्यास सहमती दर्शवली आणि त्यानंतर न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला. या अनोख्या प्रकरणामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.