

Blackbuck
esakal
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. आता त्यात भर पडली आहे ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए परिसरात काळवीट दिसण्याची. मोकळ्या जागेत आणि रस्त्यावर ही काळवीट फिरताना नागरिकांच्या लक्षात आली आहेत. जगंली प्राणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीजवळ येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.