

Maharashtra Witnesses Drop in Minimum Temperature
Sakal
पुणे : पुण्यासह राज्यात पहाटे आणि रात्री काहीसा गारवा जाणवू लागला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, सांगली येथे बुधवारी २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होते. विदर्भातही अमरावती, गोंदिया, वाशीम, यवतमाळ येथे २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.