

Pune Turns into Cycling Hub as Grand Race Finale Draws Huge Crowd
Sakal
पुणे : ‘आम्ही पुणेरी...’, ‘वो सिकंदर ही दोस्तो कहलता है...’ या गाण्यावर थिरकणारी तरुणाई, पुणेकरांकडून टाळ्यांचा गजर आणि जगभरातील थेट प्रक्षेपणाच्या साक्षीने ‘पुणे ग्रँड टूर २०२६’चा जल्लोषात आणि दिमाखात समारोप झाला. पुणेकरांच्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने आंतरराष्ट्रीय सायकलपटूही भारावून गेले. विजेता ल्यूक मडग्वेसह अन्य खेळाडूंनी नागरिकांना स्पर्धेचे मॅस्कॉट इंदू भेट देत आनंदोत्सव साजरा केला. हा अविस्मरणीय क्षण मोबाईलमध्ये साठवत पुढील वर्षी पुन्हा स्पर्धेसाठी येण्याचे आश्वासन सायकलपटूंनी पुणेकरांना दिले.