
Pune Ganesh Festival
sakal
पुण्याच्या मध्यवस्तीत रस्त्याच्या कानाकोपऱ्यात ओसंडून वाहणारी गणेश भक्तांची लाट... जिकडे तिकडे गर्दीने भरभरून वाहणारे रस्ते... देखाव्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद... जागोजागी खाऊगल्ली व वस्तू खरेदीसाठी झालेली गर्दी... एकंदरीत अवघी पुण्यनगरी गणेशभक्ती रसात न्हाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.