Woman Cancer : महिलांच्या कर्करोगावर ‘विश्रांती’ची मात्रा

पुण्यातील सदर बाजार येथे ‘केअर इंडिया मेडिकल सोसायटी’च्या माध्यमातून तसेच दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून विश्रांती हॉस्पिटल चालवले जाते.
Cancer
CancerSakal
Updated on
Summary

पुण्यातील सदर बाजार येथे ‘केअर इंडिया मेडिकल सोसायटी’च्या माध्यमातून तसेच दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून विश्रांती हॉस्पिटल चालवले जाते.

पुणे - कर्करोगावर योग्य उपचार न मिळाल्याने कर्नल एन. एस. न्यायपती (निवृत्ती) यांच्या आईचा १९९० मध्ये मृत्यू झाला. हे दुःख त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी पत्नी भूलतज्ज्ञ डॉ. माधुरी यांच्या साथीने लोकहितासाठी कर्करोगावर मोफत उपचार देणारे विश्रांती हॉस्पिटल हे २०१३ उभे केले. यामाध्यमातून त्यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले. इतकेच नव्हे, तर रुग्णांना जगण्यासाठी बळदेखील या ठिकाणी दिले जात आहे.

पुण्यातील सदर बाजार येथे ‘केअर इंडिया मेडिकल सोसायटी’च्या माध्यमातून तसेच दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून विश्रांती हॉस्पिटल चालवले जाते. देशभरातील कर्करोगाचे पुरुष-महिला रुग्ण या ठिकाणी येऊन मोफत उपचार घेतात. तोंड, स्तन, गर्भाशय, अंडाशय यावर येथे उपचार केले जातात.

असे चालतात उपचार

कर्करोगाचे एक, दोन, तीन व चार असे टप्पे (स्टेज) असतात. पहिल्या तीन स्टेजमध्ये रुग्ण बरा होण्याची शक्यता असते. मात्र, चौथ्या स्टेजमध्ये रुग्णाचे वय, मनोधैर्य, जगण्याची उमेद यावरती उपचार कसे होतील हे अवलंबून असते. स्टेज एक व दोनवर रुग्ण असेल, तर केमोथेरपी (कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी तसेच, शरीराच्या अन्य भागात पसरू नये यासाठी उपयोगात येणारी औषधप्रणाली) पद्धतीने उपचार केले जातात. रुग्ण वयोवृद्ध असेल, तर पॅलिएटिव्ह (उपशामक) पद्धतीने उपचार दिले जातात.

स्तन

स्तनांच्या आकारात बदल, एक किंवा दोन्ही बोंडामधून स्राव, बोंडावर किंवा त्यावरती पुरळ, बोंड आता ओढले जाणे किंवा आकार बदलणे, पू किंवा रक्तस्राव, स्तनात वेदना किंवा गाठ जाणवणे.

गर्भाशय

रजोनिवृत्तीनंतरही योनिगत रक्तस्राव होणे, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्राव, ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पोटात गाठ जाणवणे, योनिमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.

तोंड

तोंडात गालाच्या आतल्या बाजूला फोड येणे, तोंडात इजा होणे, ओठ फाटणे आणि जखम सहजासहजी न भरणे, तोंडातून दुर्गंध येणे, आवाज बदलणे, गिळण्यास त्रास होणे, जास्त लाळ किंवा रक्त येणे.

अंडाशय

पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात वेदना, लघवी करताना त्रास, अचानक बद्धकोष्ठता, भूक कमी लागणे, वजन कमी होणे, मासिक पाळीत अनियमितता, लघवीला वारंवार जावे लागणे, ओटीपोटात दुखणे.

रुग्णांना कर्करोगाचा त्रास कमी व्हावा, त्यांच्यावर मोफत उपचार करून समुपदेशन व्हावे, या उद्देशाने पत्नी डॉ. माधुरी यांच्या संकल्पनेतून हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.

- कर्नल एन. एस., न्यायपती (निवृत्त), संस्थापक-विश्वस्त, विश्रांती हॉस्पिटल

दहा महिन्यांपासून मला हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार मिळत आहेत. हॉस्पिटलमध्ये मिळणारी सेवा चांगली आहे. उपचार घेत असल्याने माझा आजार कमी झाला आहे.

- रजिया मेमन, रुग्ण, सातारा

हे रुग्णालय रुग्णांसाठी मंदिर व माहेरघर आहे. रुग्णांना येथे स्वतःचे घर असल्याचे जाणवते. कर्करोगाचे उपचार सगळीकडेच मिळतात. मात्र, या उपचारामागची भावना ही सेवा आहे.

- डॉ. अनंतभूषण रानडे, कर्करोग तज्ज्ञ

सत्सेवा योजनेतून रुग्णसेवा

कर्नल एन. एस. न्यायपती (निवृत्त) यांनी १९९३मध्ये ‘सत्सेवा योजना’ सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन मोफत रुग्णसेवा चालू केली. घरातून रुग्णसेवेचा सुरू झालेला प्रवास आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातील नागरिकांना त्यांच्या जवळपास उपचार मिळावे, यासाठी कराड शहरात उपचार केंद्र उभारले आहे. यासाठी निवृत्त अधिकारी, देणगीदार यांची मोठी मदत मिळते.

गरजूंनो, येथे करा संपर्क

विश्रांती केअर हॉस्पिटल

पत्ता : भवानी पेठ, महात्मा फुले रस्ता, अजमेरा सोसायटी समोर, पुणे ४११०४२. संपर्क : ८८०५३२३९७३/७३५००१०५९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com