Pune Harassment Case : गणेश पार्क ते लोहगाव परिसरात महिलांची छेडछाड करून पाळायचा; शेवटी आरोपी विमानतळ पोलिसांच्या सापळ्यात!
CCTV Investigation : लोहगाव आणि गणेश पार्क परिसरात महिलांची छेडछाड व अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. २४५ सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधला.
पुणे : महिलांची छेडछाड आणि विनयभंग करून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर विमानतळ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी परिसरातील २४५ सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत आरोपीला गाठले.