Pune Woman Mountaineer
sakal
पुणे - हिमालयीन गिर्यारोहणाची समृद्ध परंपरा आणि साहसी क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘गिरीप्रेमी’च्या ‘सर्व-महिला हिमालयीन मोहिमे’अंतर्गत सर्व महिला गिर्यारोगकांनी लडाखमधील रुपशू प्रदेशातील ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ (६,२१० मीटर) हे कठीण शिखर यशस्वीपणे सर केले आहे. या शिखरवीरांगनांनी शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज आणि गिरीप्रेमीचा ध्वज अभिमानाने फडकवून आपल्या अफाट जिद्दीचे आणि धैर्याचे दर्शन घडवले.