Pune : दिव्यांग, अर्भवती महिलांचे वर्क फ्राॅम बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

work from home

Pune : दिव्यांग, अर्भवती महिलांचे वर्क फ्राॅम बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे ः कोरोनामुळे महापालिकेच्या सेवेतील दिव्यांग आणि गरोदर महिलांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, आता दुसरी लाट ओसरल्याने ही सवलत रद्द करण्यात आली आली असून, या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

कोरोनाची साथ वाढत असताना शासकीय व खासगी कार्यालयातील उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आलेली होती. जे कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेत नाहीत त्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली. दिव्यांग कर्मचारी आणि गर्भवती महिलांची प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना घरूनच काम करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते.

हेही वाचा: T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

शहरातील कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी होत असून, अनेक महापालिकेचे कोरोना रुग्णालये देखील बंद झाली आहे. त्यामुळे शासनाच्या नोव्हेंबर महिन्यात काढलेल्या सुधारित आदेशात नुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यास अनुसरून कर्मचाऱ्यांना दिलेली सवलत रद्द केली असल्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढले आहे.

loading image
go to top