
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात यवत येथे निळकंठेश्वर मंदिरातील एका मूर्तीची एका अज्ञात व्यक्तीने विटंबना केली असल्याची संतापजनक घटना समोर आली या घटनेचे तीव्र पडसाद यवतसह दौंड तालुक्यात उमटले असून गावागावात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. काल यवतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.