पुणे : पैशांसाठी शिवीगाळ, मारहाण केल्यामुळे तरुणाचा खून| Murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

पुणे : पैशांसाठी शिवीगाळ, मारहाण केल्यामुळे तरुणाचा खून

पुणे : अल्पवयीन मुलांना (Teenage boys) शिवीगाळ करुन त्यांच्याकडे सिगारेट व पेट्रोलसाठी जबरदस्तीने पैसे मागणे (Ragging) आणि पैसे न दिल्यास त्यांना मारहाण करण्याचा प्रकार तरुणाकडून सुरू होता. हा प्रकार सातत्याने घडत असल्याच्या रागातुन अल्पवयीन मुलांनी रविवारी सायंकाळी कर्वेनगर येथे तरुणावर कोयत्याने वार करुन खुन केल्याचे कारण स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

अनिल राजेंद्र जाधव (वय 20, रा. डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर येथील लक्ष्मीनगर परिसरात अनिल त्याच्या बहिणीला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्यांनी अनिलवर तलवारीने वार करुन त्याचा खुन केला होता. या घटनेप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु होता.

हेही वाचा: इथे ओमिक्राॅन नाही का? मास्क कोण घालणार : एकनाथ शिंदे

या घटनेनंतर दरम्यान, या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुले रविवारी रात्री चांदणी चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने चांदणी चौकातुन दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. अल्पवयीन मुले व जाधव हे एकाच परिसरात होते तसेच त्यांची मैत्री होती. जाधव हा येता-जाता त्यांना शिवीगाळ करीत असे. सिगारेट व गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी त्यांच्याकडे जबरदस्तीने पैसे मागत होता.

त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यास जाधव त्यांना मारहाण करीत होता. दोन महिन्यांपुर्वी जाधवने त्याच्या अन्य साथीदारांसमवेत एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. तसेच रविवारी अनिलने एका अल्पवयीन मुलाकडील सोन्याची साखळी घेऊन त्यांना कर्वेनगर येथील एका दुकानासमोर बोलाविले होते. या रागातुनच तिघांनी जाधव याच्यावर तलवार व कोयत्यांनी वार करुन त्याचा खुन केल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बुवा, पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

टॅग्स :Pune Newsmurder