Pune : राहूत दोन गावठी कट्टे विनापरवाना बाळगल्या प्रकरणी तरूणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Pune : राहूत दोन गावठी कट्टे विनापरवाना बाळगल्या प्रकरणी तरूणाला अटक

राहू : येथे दोन गावठी कट्टयासह 70 हजार दोनशे रुपयाची रोकड जवळ बाळगल्या प्रकरणी एका तरुणास अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (ता. ९ )रात्री उशिरा केली. तुषार तात्या काळे वय २० वर्षे,रा.वाळकी (ता. दौंड), असे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यवत पोलीस स्टेशन हद्दीत फरार आरोपींचे शोध कामी पेट्रोलिंग करीत असताना खबरयामार्फत तुषार काळे राहू येथील एका हॉटेल जवळ विनापरवाना बेकायदेशीर गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तुषार तात्या काळे वय 20 वर्षे,रा.वाळकी तालुका दौंड,जिल्हा पुणे असे सांगितले . बॅगची झडती घेतली असता सदर बॅगमध्ये विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने बाळगलेले 2 गावठी कट्टे व 70 हजार 200 मुद्देमाल हस्तगत केला. सदर आरोपी विरोधात पोलीस हवालदार सचिन घाडगे यांनी फिर्याद दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार सचिन घाडगे,अजित भुजबळ, अजय घुले, विजय कांचन, गुरू जाधव, धिरज जाधव, अक्षय सुपे यांच्या पथकाने केली आहे.

खरा मास्टर माईंड शोधणे गरजेचे..!

राहू (ता. दौंड) येथील 26 नोव्हेंबर 2011 गोळीबार प्रकरणातील हत्याकांड संपूर्ण राज्यभरात गाजले होते. राहूपरिसरात यापूर्वी अनेकदा गावठी कट्टे पोलिसांना आढळून आले आहे. हे गावठी कट्टे पुरवणारे नेमकी टोळी आणि यांचा मोहरक्या स्थानिक की परप्रांतीय आहे .अशा मास्टरमाईंडचा तपास पोलिसांनी कसून केल्यास खरं गुन्हेगारीचं गौड बंगाल बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. परिसरात अनेकांकडे गावठी कट्टे असल्याची चर्चा आहे. वेळीच पोलिसांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा न घातल्यास ज्यादा पैशाच्या मोहापोटी अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळू शकतात. असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे