'प्ले बॉय' होण्याच्या मोहात पुण्यातील तरुणाने गमावले 17 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money fraud

'प्ले बॉय' होण्याच्या मोहात पुण्यातील तरुणाने गमावले 17 लाख

पुणे: 'प्ले बॉय' होण्याच्या मोहात पुण्यातील तरुणाने 17 लाख गमावले आहेत. वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा यामध्ये त्याने लावला आणि तो 'इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या भुलभुलैयात गमावला आहे. फेसबुकवरुन प्ले बॉय कंपनीचं लायसन काढण्यासाठी आणि मेंबर होण्यासाठी 'इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस'चे ऑनलाईन मेंबर होण्यासाठी त्याने रजिस्ट्रेशन केलं होतं.

हेही वाचा: तिढा सुटला! आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

एकूण 17,38,822 रुपये त्याने या साऱ्या प्रकरणात गमावले आहेत. तरुणाला फेसबुकवर प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन काढून देतो असं खोटं सांगण्यात आलं होतं. तासाला ३००० रुपये कमावता येतील हे ऐकताच त्याने फोन पे मार्फत वेगवेगळ्या अकाउंटवर १७ लाख रुपये भरले. मात्र काही पैसे मिळाले नसल्याचं त्याला लक्षात आलं. या साऱ्या प्रकरणामध्ये आपली फसवणूक झाल्याचं कळताच या तरुणानं पोलिस स्टेशन गाठलं. या सर्व प्रकाराची तक्रार दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Pune Youth Loses Rs 17 Lakh In Temptation To Become Play Boy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News