Pune Man Claims Showroom Sold Defective Bike Holds Protest Video Viral

Pune Man Claims Showroom Sold Defective Bike Holds Protest Video Viral

Esakal

मी येडा बनलो, तुम्ही नका होऊ! पुण्यात डुप्लिकेट गाड्या दिल्याचा आरोप करत तरुणाचं शोरूमसमोरच आंदोलन, VIDEO VIRAL

नवी दुचाकी घेतल्यानंतर अनेकदा बिघडली, त्याबाबत तक्रार केल्यावर शोरूमकडून दमदाटी केली गेल्याचा दावा करत एका तरुणाने पुण्यातील दुचाकीच्या शोरूमवर गंभीर आरोप केलेत. शोरूमच्या दारातच आंदोलन केल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Published on

पुण्यात सातारा रोडवर एका दुचाकीच्या शोरूममध्ये डुप्लिकेट गाड्या दिल्या जात असल्याचा आरोप करत तरुणाने अनोखं आंदोलन केलं. पुणे सातारा रोडवर हिरो कंपनीचं दुचाकीचं साईदीप नावाचं शोरूम आहे. या शोरूममधून तरुणाने दुचाकी घेतली होती. दुचाकीच्या खरेदीत आपली फसवणूक झाल्याचा दावा करत शोरूमवाले आणि सर्विस सेंटर वाल्यांकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप तरुणाने केलाय. त्याने शोरूमच्या दारात दुचाकीवर हातात बोर्ड घेत निषेध नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com