Pune News: पुणेकरांनी अनुभवली शून्य सावली; प्रात्यक्षिकांची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित
Pune Witnesses Rare Zero Shadow Phenomenon: पुणेकरांनी अनुभवला वर्षातून दोनदा येणारा शून्य सावली दिवस; सूर्याची थेट प्रकाशाची दिशा मोजून सावली अदृश्य झाली.
पुणे : सूर्य दुपारी माथ्यावर आल्याने आपलीच सावली पायाखाली हरवल्याचा आगळावेगळा खगोलीय अनुभव आज पुणेकरांनी घेतला. शहरात दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांच्या सुमारास ‘शून्य सावली’चा आविष्कार पाहायला मिळाला.