

Pune ZP to Establish Two Science Parks
Sakal
पुणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुण्यात दोन सायन्स पार्क केले जाणार आहेत. त्यासाठी पाच गावांमधील जागेची पाहणी करण्यात आली असून, दळणवळणासह इतर सुविधा पाहून त्यापैकी दोन गावांची सायन्स पार्कसाठी निवड केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी वीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.