

RTE Admission
sakal
पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेतील तालुकानिहाय माहिती देण्यावरून तसेच कथित गैरप्रकारांवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी खडाजंगी झाली. प्रवेश प्रक्रियेची माहिती मागूनही ती दिली जात नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विजय शिंदे यांनी केला. तसेच, प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आरटीई प्रवेशांपैकी १० टक्के प्रकरणांची तपासणी सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.