.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
water supply scheme
पुणे - पाणी योजनांची कामे रखडलेली, तर कुठे दुर्गम गावांना पाण्याचा स्रोतच अपुरा पडत आहे. गावांना पाणी नाही आणि टंचाईच्या तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. कडूस, मुळशीसह इतर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या दुरवस्थेवरून सर्वसाधारण सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आठवडाभरात कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिले.