पुणे : ५८ वर्षानंतर झेडपी अध्यक्षांच्या बंगल्याचं झालं 'बारसं'!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यासाठी अजित पवार यांना पत्र दिले होते.
या पत्रानुसार पवार यांनी अध्यक्षांच्या या मागणीस तत्काळ परवानगी दिली.

पुणे : जिल्हा परिषदेच्या पुण्यातील सरकारी बंगल्याला आता 'शिवाई'
हे नाव देण्यात येणार आहे. या नव्या नावाला उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी परवानगी दिली आहे. यामुळे तब्बल 58 वर्षांनंतर झेडपी अध्यक्षांच्या बंगल्याला अधिकृत नाव मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील 'शिवाई' देवीवरून हे नाव देण्यात आले आहे.

पुण्यातील रिक्षाचालकांनी घेतला बंदचा पवित्रा; उद्याच्या बैठकीत होणार निर्णय!​

अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यासाठी अजित पवार यांना पत्र दिले होते.
या पत्रानुसार पवार यांनी अध्यक्षांच्या या मागणीस तत्काळ परवानगी दिली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनाही तशा सूचना दिल्या. अध्यक्षा पानसरे यांनीही याबाबत चव्हाण यांच्याशी चर्चा केली आणि तत्काळ 'शिवाई' या नवीन नावाचा फलक लावण्याबाबत सूचना केली.

लष्कर परिसरातील क्वीन्स गार्डनमध्ये गुलमोहर सोसायटीत हा शासकीय बंगला आहे. सध्या तो शासकीय निवास क्रमांक सात या नावाने ओळखला जातो. या सोसायटीत एकूण तीन इमारती आहेत. यापैकी अध्यक्षांचे निवासस्थान असलेला हा एकमेव बंगला आहे. अन्य दोन इमारतीत भारतीय प्रशासकीय, पोलिस आणि वन सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीच्या सदनिका आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Zilla Parishad presidents bungalow received official name after 58 years