

Zilla Parishad Students Head to NASA
Sakal
पुणे : ग्रामीण भागांतील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ विद्यार्थी १० दिवसांच्या नासा अभ्यास दौऱ्यासाठी शनिवारी (ता. १५) रवाना होणार आहेत.दौऱ्याला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांसह शिक्षक-पालक उपस्थित होते.