esakal | पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या जागा येत्या 5 नोव्हेंबरला भरणार
sakal

बोलून बातमी शोधा

pune zilla parishad subject committee seats will be filled on November 5

सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग चालू आहे. यामुळे जाहीर कार्यक्रम, जाहीर सभा आणि जिल्हा परिषदेच्या ऑफलाइन मासिक आणि सर्वसाधारण सभा घेण्यास बंदी आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभा आतापर्यंत ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या जागा येत्या 5 नोव्हेंबरला भरणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांवरील सदस्यांच्या सर्व रिक्त जागा या येत्या 5 नोव्हेंबरला भरल्या जाणार आहेत. या जागा भरण्यासाठी खास सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राज्याच्या ग्रामविकास खात्याने परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पुरवणी अर्थसंकल्प मंजुरीतील तांत्रिक अडसर दूर झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग चालू आहे. यामुळे जाहीर कार्यक्रम, जाहीर सभा आणि जिल्हा परिषदेच्या ऑफलाइन मासिक आणि सर्वसाधारण सभा घेण्यास बंदी आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभा आतापर्यंत ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. यामुळे विविध विषय समित्यांवरील सदस्यांच्या रिक्त जागा भरता आल्या नाहीत. परिणामी अर्थ समितीवरील सर्वच्या सर्व आठही जागा रिक्त असल्याने, पुरवणी अर्थसंकल्प मंजुरीबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देत, खास बाब म्हणून सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

विद्यमान पदाधिकाऱ्यांची निवड जानेवारी महिन्यात झाली आहे. निवडीनंतर अडीच महिन्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे सर्वसाधारण सभा आयोजित करता आली नाही. या निवडी सर्वसाधारण सभेत कराव्या लागतात. मात्र, तेव्हापासून आजतागायत ऑफलाइन सर्वसाधारण सभाच झाली नाही. त्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या सभेत अर्थ समितीच्या आठ, कृषी व पशुसंवर्धन प्रत्येकी चार, बांधकाम व आरोग्य प्रत्येकी तीन, स्थायी समिती दोन आणि जलसंधारण, शिक्षण व सामाजिक न्याय समितीवरील प्रत्येकी एका अशा एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

loading image