
पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे कोणाचे पत्ता कट आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पुणे - पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, विवेक वळसे पाटील, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, प्रवीण माने, माजी कृषी सभापती सुजाता पवार, बाबुराव वायकर, मावळत्या सभागृहातील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर आदींचे पत्ते आरक्षण सोडतीमध्ये कट झाले आहेत.
याउलट माजी अध्यक्ष देवराम लांडे, निर्मला पानसरे, माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील, माजी महिला बालकल्याण सभापती सुनीता गावडे, वैशाली पाटील, पूजा पारगे, मावळत्या सभागृहातील काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, माजी ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत बाठे, वीरधवल जगदाळे आदींना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. २८) काढण्यात आली. या सोडतीमुळे कोणाचे पत्ता कट आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक शाखेचे समन्वयक व उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विनायक राऊत आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत प्रशासक कामकाज पाहत आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा (ओबीसी) मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने ही आरक्षण सोडत लांबणीवर पडली होती. अखेर गुरुवारी ही सोडत पार पडली. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सात जागा वाढल्याने नव्या सभागृहात ८२ सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ही संख्या ७५ इतकी होती. एकूण ८२ सदस्यांपैकी विविध प्रवर्गातील मिळून एकूण ४१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांची संख्या तीनने वाढणार आहे. एकूण जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) ८, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एसटी) ६ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२जागा आरक्षित झाल्या आहेत.
खुला संवर्ग (एकूण जागा ४६ पैकी २३ महिला)
खुला (सर्वसाधारण)
१) डिंगोरे-उदापूर (ता. जुन्नर)
२) खामगाव - तांबे (ता. जुन्नर)
३) कारेगाव- रांजणगाव गणपती (ता. शिरूर)
४) करंदी-कान्हूर मेसाई (ता. शिरूर)
५) न्हावरा- निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर)
६) वाडा- सातकरस्थळ (ता. खेड)
७) टाकवे बुद्रुक- नाणे (ता. मावळ)
८) माण-कासार अंबोली (ता. मुळशी)
९) वाडेबोल्हाई-कोरेगाव मूळ ( ता. हवेली)
१०) खेड शिवापूर- खानापूर (ता. खेड)
११)राहू-खामगाव (ता. दौंड)
१२) गोपाळवाडी-कानगाव (ता. दौंड)
१३) लिंगाळी-देऊळगावराजे (ता. दौंड)
१४) पाटस-कुरकुंभ (ता. दौंड)
१५) वरवंड-बोरीपार्धी (ता. दौंड)
१६) पिसर्वे- माळशिरस (ता. पुरंदर)
१७) मांडकी-परिंचे (ता. पुरंदर)
१८) वेल्हे बुद्रुक- वांगणी (ता. वेल्हे)
१९) भोंगवली- संगमनेर (ता. भोर)
२०) भोलावडे- शिंद (ता. भोर)
२१) कारी-ऊत्रोली (ता. भोर)
२२) निमगाव केतकी- शेळगाव (ता. इंदापूर)
२३) बावडा-लुमेवाडी (ता. इंदापूर).
खुला संवर्ग (महिला)
१) ढालेवाडी तर्फे हवेली - सावरगाव (ता. जुन्नर)
२) राजुरी-बेल्हे (ता. जुन्नर)
३) शिनोली-बोरघर (ता. आंबेगाव)
४) घोडेगाव- पेठ (ता. आंबेगाव)
५) कडूस - शिरोली (ता. खेड)
६) पाईट - पिंपरी बुद्रुक (ता. खेड)
७) कुरवंडे - कार्ला (ता. मावळ)
८) ऊरळीकांचन- सोरतापवाडी (ता. हवेली)
९) कदमवाकवस्ती - थेऊर (ता. हवेली)
१०) कोळविहीरे - बेलसर (ता. पुरंदर)
११) मोरगाव- मुढाळे (ता. बारामती)
१२) सणसर- बेलवडी (ता. इंदापूर)
१३) पाडळी-येणेरे (ता. जुन्नर)
१४) कुसगाव बुद्रुक-सोमाटणे (ता. मावळ)
१५) चांदखेड-काले ( ता. मावळ)
१६) हिंजवडी - कासारसाई (ता. मुळशी)
१७) भिगवण- शेटफळगढे (ता. इंदापूर).
१८) सणसवाडी- कोरेगाव भीमा (ता. शिरूर)
१९) रेटवडी- कन्हेरसर (ता. खेड)
२०) गराडे - दिवे (ता. पुरंदर)
२१) पिंपळगाव तर्फे खेड -काळूस (ता. खेड)
२२) नीरा शिवतक्रार - वाल्हे (ता. पुरंदर)
२३) पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक - जारकरवाडी (ता. आंबेगाव)
अनुसूचित जाती (एकूण जागा आठ पैकी चार महिला)
अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
१) खडकाळे-वराळे (ता. मावळ)
२) वडगाव निंबाळकर - सांगवी बुद्रुक (ता.बारामती)
३) वडापुरी-माळवाडी (ता. इंदापूर)
४) काटी- वरकुटे खुर्द (ता. इंदापूर)
अनुसूचित जाती (महिला)
१) नीरावागज-डोर्लेवाडी (ता. बारामती)
२) खडकी-राजेगाव (ता. दौंड)
३) गुणवडी-पणदरे (ता. बारामती)
४) पारगाव-पिंपळगाव (ता. दौंड)
अनुसुचित जमाती (एकूण जागा सहा पैकी तीन महिला)
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
१) अवसरी बुद्रुक - पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे (ता. आंबेगाव)
२) शिरूर ग्रामीण- निमोणे (ता. शिरूर)
३) वडगाव रासाई- मांडवगण फराटा (ता. शिरूर)
अनुसूचित जमाती (महिला)
१) कळंब-चांडोली बुद्रूक(ता. आंबेगाव)
२) बोरी बुद्रुक-खोडद (ता. जुन्नर)
३) आळे-पिंपळवंडी (ता. जुन्नर)
नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीस - एकूण जागा २२ पैकी ११ महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
१) नारायणगाव- वारुळवाडी (ता. जुन्नर)
२) टाकळी हाजी- कवठे येमाई (ता. शिरूर)
३) तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर (ता. शिरूर)
४) म्हाळुंगे- आंबेठाण (ता. खेड)
५) इंदोरी-तळेगाव दाभाडे ग्रामीण (ता. मावळ)
६) विंझर-पानशेत (ता. वेल्हे)
७) वेळू-नसरापूर (ता. भोर)
८) काटेवाडी- शिर्सूफळ (ता. बारामती)
९) निंबूत-वाघळवाडी (ता. बारामती)
१०) लासुर्णे-वालचंदनगर (ता. इंदापूर)
११) ओतूर - उंब्रज (ता. जुन्नर)
नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला (ओबीसी महिला)
१) अंथुर्णे-बोरी (ता. इंदापूर)
२) कोळवण-माले (ता. मुळशी)
३) नायफड- अवदर (ता. खेड)
४) पळसदेव- बिजवडी (ता. इंदापूर)
५) कुरुळी-मरकळ (ता. खेड)
६) नाणेकरवाडी- मेदनकरवाडी (ता.खेड)
७) यवत-बोरीभडक (ता. दौंड)
८) सुपा-काऱ्हाटी (ता. बारामती)
९) पिरंगुट-भुगाव (ता. मुळशी)
१०) लोणीकाळभोर -कुंजीरवाडी (ता. हवेली)
११) पेरणे- लोणीकंद (ता. हवेली).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.