esakal | पुणे झेडपीच्या पहिल्या महिला सिईओ चारुशीला सोहनी यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Charushila Sohani

पुणे झेडपीच्या पहिल्या महिला सिईओ चारुशीला सोहनी यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) चारुशीला सोहनी यांचे मंगळवारी (१४ ) दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. त्या ७४ वर्षाच्या होत्या.

सोहनी या २१ मे १९८१ ते २९ मार्च १९८२ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होत्या. तेव्हा दिवंगत माजी मंत्री बापूसाहेब थिटे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, गणपतराव आवटी उपाध्यक्ष आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे वडील कै. दत्तात्रेय वळसे-पाटील हे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती होते.

हेही वाचा: रोजगारासाठी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासाकडे ओढा

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर १९ वर्षांनी म्हणजेच १९८१ ला सोहनी यांच्या माध्यमातून पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्या होत्या. त्यानंतर १९९८ मध्ये व्ही. राधा या दुसऱ्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्या. तेव्हापासून आजतागायत पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी महिलेला संधी मिळू शकली नाही.

सोहनी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७१ घ्या तुकडीतील महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी होत्या. त्या ३० नोव्हेंबर २००७ ला केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.१५) दुपारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image
go to top