esakal | रोजगारासाठी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासाकडे ओढा
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगारासाठी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासाकडे ओढा

रोजगारासाठी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासाकडे ओढा

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे: आयटीआय, डिप्लोमाबरोबरच विद्यार्थ्यांचा आता कौशल्यविकास अभ्यासक्रमांकडे ओढा वाढला आहे. हमखास रोजगाराची हमी आणि परवडणाऱ्या दरातील शिक्षण म्हणून विद्यार्थी आता कौशल्य आधारित प्रमाणपत्र किंवा पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती दर्शवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या वाढल्याचे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा: पिंपरी: आरटीईच्या हजारो जागा रिक्त

राज्यातील दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागल्याने अकरावी, पदविका आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल असा कयास होता. मात्र या प्रवेशांना नेहमीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थी आता कौशल्याधारीत नव्या अभ्यासक्रमांचे मार्गही अवलंबिताना दिसत आहे. कौशल्य विकास महामंडळाबरोबरच कौशल्य विकास, रोजगार आणि विकास आयुक्तालयामार्फतही कमी कालावधीचे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती का?

- कौशल्याधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांतून रोजगाराची हमी

- कमी कालावधीचे अभ्यासक्रम

- नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराचा पर्याय उपलब्ध

- तुलनेने परवडणाऱ्या दरात शिक्षण

कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा कालावधी

- सहा महिन्यांचा प्रमाणपत्र

- एक वर्षाचा प्रमाणपत्र

- दोन वर्षांचा पदविका

या अभ्यासक्रमांना पसंती

- पॅरामेडिकल

- रिअल इस्टेट

- संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर

- डाटा एन्ट्री, नेटवर्क टेक्निशियन

कौशल्य विकास महामंडळाची व्याप्ती

- शैक्षणिक संस्था : १२७५

- प्रवेश क्षमता : ७५३००

- अभ्यासक्रमांची संख्या : २९४

- शैक्षणिक संस्थांसाठी नवे प्रस्ताव : १२०

- वाढणारी प्रवेश संख्या (अंदाजे) : १२०००

"लवकर नोकरी मिळावी किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून मी आयटीआयला प्रवेश घेत आहे. इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण घेऊन कंपनीत नोकरी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आमच्या वर्गातील मुलांनीपण आता अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचे ठरविले आहे."- ओमकार जाधव, परभणी

"मागच्या वर्षीच्या तुलनेत कौशल्य विकास अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून कौशल्य विकास महामंडळाकडे अभ्यासक्रमांसाठी विचारणा होत आहे. असे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यंदा १२० संस्थांनी अर्ज केले आहेत."- डॉ.अनिल जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ

loading image
go to top