
या राजकीय मान्यवरांच्या या धडाकेबाज क्रिकेटची शुक्रवारी माळशिरस आणि परिसरातील तरुणांमध्ये चर्चा ऐकावयास मिळाली.
माळशिरस (पुणे) : माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे हे माळशिरस येथील क्रिकेट सामन्यात केलेल्या बॅटिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माळशिरस येथे भुलेश्वर क्रिकेट क्लबच्यावतीने सध्या हाप पिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणेश जगताप, पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते, सोनाली यादव, सरपंच महादेव बोरावके, ह.भ.प. लक्ष्मण महाराज यादव, एकनाथ यादव, माऊली यादव यांच्या उपस्थितीत झाले.
- एका पावसात हवेचं प्रदूषण आलं निम्म्यावर; मुंबईच्या तुलनेत पुणे ठरलं वरचढ
यावेळी उद्घाटनापूर्वी दत्ता झुरुंगे यांनी क्रिकेट खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. माजी उपसरपंच माऊली यादव यांनी धडाकेबाज बॉलिंग केली. तितक्याच आक्रमकपणे दत्ता झुरुंगे यांनी देखील बॅटिंग करत क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. गणेश जगताप, महादेव बोरावके यांना देखील यामुळे क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. या राजकीय मान्यवरांच्या या धडाकेबाज क्रिकेटची शुक्रवारी माळशिरस आणि परिसरातील तरुणांमध्ये चर्चा ऐकावयास मिळाली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडीत भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांना विरोध केल्याने झुरुंगे चर्चेत आले होते.
- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)