
Digital Farm Support
Sakal
पुणे : शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी वैयक्तिक लाभ योजना पहिल्यांदाच जिल्हा परिषदेने ऑनलाइन राबविण्याचा निर्धार केला आहे. कृषी विभागाकडून विविध शेती उपयोगी साहित्यांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत. यापूर्वी काही वर्षांपूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात कागदपत्रांची जंत्री द्यावीच लागत होती. परिणामी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला हरताळच फासला होता. यावर्षी मात्र पूर्ण प्रक्रियाच ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात अाल्याचा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त केला आहे.