तीन नेते ठरवणार पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड येत्या शनिवारी (ता. 11) केली जाणार आहे. नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे येत्या शुक्रवारी (ता.10) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची चर्चा करणार आहेत. याशिवाय सर्व इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेणार आहेत.

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड येत्या शनिवारी (ता. 11) केली जाणार आहे. नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे येत्या शुक्रवारी (ता.10) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची चर्चा करणार आहेत. याशिवाय सर्व इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. बहुमतासाठी 38 सदस्यांची आवश्यककता आहे. प्रत्यक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 42 सदस्य आहेत. याशिवाय लोकशाही क्रांती आघाडी आणि दोन अपक्ष अशा एकूण तीन सदस्यांचा एकमुखी पाठिंबा आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असणार आहेत.

दौंड, इंदापूर, हवेलीच्या शेतकऱ्यांना बसणार फटका कारण...

शिवाय राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेस या जुन्या मित्रांसोबतच जिल्हा परिषदेत शिवसेना हा आणखी एक नवा मित्र मिळालेला आहे. या तीनही पक्षांचे मिळून 66 सदस्य होत आहेत. भाजपचे केवळ सात सदस्य आहेत. याशिवाय रासपचा एक सदस्य आहे. उर्वरित एक जागा रिक्त आहे. 

पुणे जिल्हा परिषदेचे आगामी अडीच वर्षासाठीचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 42 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 24 महिला आहेत. यापैकी 15 महिला या सर्वसाधारण गटातून तर, उर्वरित नत्र महिला या राखीव विविध राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune zp president will be decided by ajit pawar valse patil and datta bharane