
ZP Teachers
Sakal
पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलीचे सातही टप्पे पूर्ण झाले. मात्र, शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला मागे घ्यावे लागले. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी २५५ शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यामुळे इतर चार हजार शिक्षकांना या अडीचशे शिक्षकांसाठी थांबावे लागणार आहे. परिणामी जिल्हा परिषद शिक्षकांची सात महिन्यांपासून सुरू असलेली बदली प्रक्रिया पूर्ण होण्याचे काही केल्या नाव घेईना.