पुणेकरांनी माझे 'ते' विधान विनोदाने घ्यावे : आदित्य ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

आफ्टरनून लाईफ संदर्भामध्ये मी केलेले विधान पुणेकर विनोदाने घेतील, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.

पुणे : 'आफ्टरनून लाईफ संदर्भामध्ये मी केलेले विधान पुणेकर विनोदाने घेतील, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे इंटरनॅशनल सेंटर ने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्यापूर्वी आफ्टरनून लाईफ सुरू करण्याची गरज आहे, असे ठाकरे मुंबईत म्हणाले होते. या बाबत खुलासा करताना ते वक्तव्य विनोदाने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

कोणत्याही शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी मेट्रो आणि बीआरटी यासारख्या वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. पुण्यातील नदीकाठ विकसन प्रकल्पाबाबत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते  अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाकरे यांनी बोलणे टाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars should take my Afternoon life statement with humor says Aditya Thackeray