

Pune Nashik Railway Project
Esakal
मंचर - आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यातून प्रस्तावित असलेला पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग अन्य पर्यायी मार्ग नेण्याचे व प्रस्तावित जुना रेल्वे मार्ग रद्द झाल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (ता. १७) पुण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे चाकण विमानतळ प्रकल्पानंतर आता या भागातून जाणारा रेल्वे मार्गही रद्द झाल्याने नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि भाविकांमध्ये असंतोष पसरला आहे.